Gujarat Election 2022 : मतदानासाठी चक्क ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले! पाहा व्हिडिओ - अपंग महिला मतदाराने व्हीलचेअरवर बसून मतदान
अहमदाबाद, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. Gujrat Election 2022 second phase voting. मतदानात तरुणांबरोबरच ज्येष्ठ मंडळीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. elders inspire youth to cast vote. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनी मतदान केले. तर अंबावाडी परिसरात एका अपंग महिला मतदाराने व्हीलचेअरवर बसून मतदान केले. दुसरीकडे 75 वर्षीय मतदार सुरेशभाई अहमदाबादच्या नारनपुरा विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी चक्क ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले. तर एक वृद्ध मतदानासाठी वॉकरच्या सहाय्याने पोहचले. पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा येथे १०८ वर्षांच्या आजी मतदान करताना दिसल्या. याशिवाय वडोदरा येथे स्वामीनारायण संतांनी मतदान करून लोकशाहीचा सण साजरा केला. या सर्वांनी नक्कीच इतरांना मतदार म्हणून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. Gujrat Election 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST