Greetings To Chandrayaan 3: बुलडाण्यात रुद्र ढोल-ताशा पथकाच्या वतीने चंद्रयान ३ ला अनोख्या शुभेच्छा - चंद्रयान ३ ला अनोख्या शुभेच्छा
Published : Aug 23, 2023, 4:15 PM IST
बुलडाणा :भारतासाठी महत्त्वाकांक्षी असलेले चंद्रयान 3 चे आज चंद्रावर लॅंडिंग होणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी बुलडाण्यात रुद्र ढोल ताशा पथकाच्या वतीने 'चंद्रयान 3 सफल रहे'च्या घोषणा देत ढोलांच्या सहाय्याने चंद्रयान 3ची प्रतिकृती साकारत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या गेल्या. तर यशस्वीतेसाठी प्रार्थना सुद्धा केली. चंद्रयान लँडिंग होण्याकरिता काही तास उरलेले आहेत. संपूर्ण जगासह भारतात देखील याची मोठी उत्सुकता आहे. विदेशापासून तर ग्रामीण भागापर्यंत या चंद्रयान लॅंडिंगची चर्चा आहे. याच्या यशस्वी लँडिंग प्रणाली करिता सर्वजण उत्सुक आहेत. आपल्या परीने याचे स्वागत आणि यश साजरे करण्याकरिता ग्रामीण भागापर्यंत नागरिक उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेले आहेत. त्यामुळे ते हे व्हर्चुअली या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO ) आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग करुन इतिहास रचणार आहे.