Azadi Ka Amrit Mahotsav : अमरावतीत निघाली भव्य तिरंगा रॅली, शेकडो विद्यार्थ्यांचा उत्सफुर्ते सहभाग - AZADI KA AMRIT MAHOTSAV
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (AZADI KA AMRIT MAHOTSAV) अमरावती शहरातून आज 500 फूट लांब तिरंग्याची भव्य रॅली काढण्यात (Grand tricolor rally started in Amravati) आली. श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या मैदानावरून ही रॅली निघाली, असून यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले (participation of hundreds of students) होते. या रॅलीमध्ये भारत मातेची भव्य प्रतिकृती ठेवण्यात आली. तसेच, देशभक्तीपर गीत सुद्धा या रॅलीत गायले गेले. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या भारत माता की जय जयघोषामुळे, अमरावती शहर दुमदुमले असून, सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती शहरातून निघालेल्या तिरंगा रॅलीचा समारोप नेहरू मैदान येथे झाला. 'भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' प्रत्येकाने मोठ्या आनंदाने साजरा करावा आणि प्रत्येक अमरावतीकरांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST