MH Karnataka dispute:कर्नाटक सीमावादाला राष्ट्रवादीचे नेतृत्व जबाबदार असल्याचा गोपीचंद पडळकरांचा आरोप - Gopichand Padalkar alleges that the NCP leadership
सांगली - सध्याच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केला आहे. सीमा भागामध्ये विकासाचा प्रश्न निर्माण झाला त्याला त्यांचे सरकार कमी पडले, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याचबरोबर जत तालुक्यातल्या गावांना पाणी देण्याबाबतीत अडीच वर्षांमध्ये सांगली जिल्ह्याचे जे पालकमंत्री राहिलेत, जे राज्याचे जलसंपदा मंत्री देखील होते, त्यांनी फक्त जत तालुक्याला पाणी देण्याच्या घोषणा केल्या, बॅनर लावले, फटाके फोडले, गावा-गावात पाणी येणार म्हणून सांगितलं गेले, मग काय झालं? आता प्रश्न पुन्हा का आला, याचा अर्थ तुम्ही फसवणूक केली, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर हल्ला चढवला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST