Ganeshotsav 2022 आंध्र प्रदेशातील सोन्याचा गणपती ठरतोय भाविकांचे आकर्षणाचे केंद्र - सोन्याचा गणपती
आंध्र प्रदेशातील चिलकलुरीपेटा येथे चतुर्थीच्या मुहूर्तावर Ganeshotsav 2022 अनेक कलाकार आपली कला प्रकट करत आहेत. स्वर्ण लक्ष्मी महागणपती यांच्याकडून पालनाडू जिल्ह्यातील सराफ बाजारमध्ये मूर्ती तयार केली आहे. चिलाकालुरीपेट गोल्ड मर्चंट, गोल्डन युथ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मूर्ती खास हैदराबादमधील आयोजकांनी कोलकाता कारागिरांसोबत बनवली आहे. नाण्यांवर लक्ष्मीचे चित्र असमाऱ्या नाण्यांचा यात वापर करण्यात आला आहे. त्यांवर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. माणिक, पाचू आणि अमेरिकन हिरे वापरण्यात आल्याचे सराफ बाजार महोत्सव समितीचे संयोजक पोट्टी रत्नबाबू यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST