महाराष्ट्र

maharashtra

Giriraj Singh

ETV Bharat / videos

जोपर्यंत सनातन बालक जिवंत आहे तोपर्यंत बजरंग दलावर बंदी अशक्य -गिरिराज सिंह - बजरंग दलावर बंदी

By

Published : May 4, 2023, 10:47 PM IST

मुजफ्फरपुर (बिहार) :बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत सनातनचा प्रत्येक बालक जिवंत आहे, तोपर्यंत बजरंगबली आणि बजरंग दलावर बंदी येऊ देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. ते मुझफ्फरपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, सर्किट हाऊसमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मागणीला विरोध केला. त्यांना समाजात मतभेद निर्माण करायचे आहेत. अशा गोष्टी केवळ राजकीय कारणांसाठी केल्या जात आहेत, हे तेच लोक आहेत ज्यांना हिंदूंच्या विरोधात बोलून मुस्लिमांची व्होट बँक मिळवायची आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, हे समाजात फूट पाडण्याचे हे षडयंत्र आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details