Gautami patil News: गौतमी पाटीलचे आडनावासह कार्यक्रमावर आक्षेप घेणाऱ्यांना सडेतोड उत्तर, म्हणाली... - गौतमी पाटील मराठा संघटना प्रतिक्रिया
पालघर-गौतमी पाटील ही तिच्या कार्यक्रमातील गोंधळावरून नेहमीच चर्चेत असते. सध्या, तिच्या आडनावावर आक्षेप घेण्यात आल्याने चर्चेत आली आहे.पुणे येथे पार पडलेल्या मराठा समन्व्यक बैठकीत महाराष्ट्रातील लावणी फेम कलाकार गौतमी पाटील हिच्या पाटील या आडनावावर आक्षेप घेण्यात आला. ती पाटील नसून चाबूकस्वार असल्याचे बैठकीत म्हटले होते. त्यावर पालघर जिल्ह्यातील कार्यक्रमाला आलेल्या गौतमी पाटीलने सडेतोड उत्तर दिले आहे. विरार येथील खार्डी गावात गुरुवारी सत्यनारायण महापूजेनिमित्त गौतमीच्या नाच-गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ती माध्यमांशी बोलत होती. गौतमी पाटील म्हणाली, की मी पाटीलच आहे. नाव पाटीलच असल्यावर पाटीलच नाव वापरणार आहे. मला कुणीही काही बोलत आहे. त्याने मला फरक पडत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. कार्यक्रम चांगला पार पडत आला आहे. माझ्या कार्यक्रमावरून ज्याला प्रश्न असतील त्याने माझा कार्यक्रम पाहायला यावे. तो पूर्ण पाहावा मगच बोलावे, असे टीका करणाऱ्यांना गौतमीने आव्हान दिले आहे.