Singhania wife Nawaz Modi : गौतम सिंघानिया यांच्या दिवाळी पार्टीमध्ये येण्यास पत्नीलाच मज्जाव, दार ठोठावत असल्याचा व्हिडिओ वायरल - दिवाळी पार्टीमध्ये येण्यास पत्नीलाच मज्जाव
Published : Nov 13, 2023, 10:59 PM IST
ठाणे Singhania wife Nawaz Modi: रेमंड उद्योग समूहाचे गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघनिया यांचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या वायरल व्हिडिओमुळं गौतम सिंघनिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. घटना आहे गेल्या आठवड्यातील, जेव्हा त्यांच्या ठाणे येथील आलिशान बंगल्यात झालेल्या दिवाळी पार्टीमध्ये त्यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांनाच येऊ न दिल्यानं मोठा वाद झाला होता. नवाज मोदी या बराच वेळ दारावर उभ्या राहून दार ठोठावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बराच वेळ गेट ठोठावून देखील त्यांना आत प्रवेश न दिल्यानं संतापलेल्या नवाज मोदी यांनी आपल्या मैत्रिणीसह बंगल्याच्या प्रवेश दारातच ठिय्या मांडला. एवढा सगळा ड्रामा झाल्यावर देखील बंगल्यातील सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत प्रवेश न दिल्यानं नवाज यांना तिथून जावं लागलं होतं. महत्त्वाचं म्हणजे गेल्याच महिन्यात नवाज मोदी सिंघानिया यांनी पती गौतम सिंघानियावर मारहाण केल्याची तक्रार पोलिसात केली होती. या मारहाणीत त्यांच्या खांद्याचे हाड मोडल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.