Gaurikund : केदारनाथच्या मार्गातील डोंगरावरील ओढ्याला आले नदीचे रुप, पाहा व्हिडिओ - गौरीकुंड
केदारनाथ :केदारनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या डोंगरातील ओढ्याला पूर आला. हा ओढा गौरीकुंडापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान पावसामुळे ओढ्यात इतके पाणी आले की, जशी एखादी महाकाय नदी वाहत आहे. डोंगरातील या ओढ्याचे रुप पाहून भाविकांचे पाय जागेवरच थांबले. दरम्यान या भागात भूस्खलन होऊन जीवितहानी होऊन नये यासाठी पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले आहेत. पोलीस भाविकांना तेथून सुरक्षितस्थळीत नेत आहेत. सतत मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील नदी-नाल्यांना पूर आला आहे. संततधार पावसामुळे गौरीकुंड-केदारनाथ रस्त्यावरील नाल्याला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार म्हणाले, "हा नाला गौरीकुंडपासून तीन किलोमीटर पुढे आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे." मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.