Mahad MIDC प्रसोल केमिकल्स कंपनीमध्ये वायू गलती; एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर
महाड एमआयडीसीमधील Mahad MIDC प्रसोल कंपनीमध्ये Prasol Company रात्री वायुगळती झाली. यात एका कामगाराचा मृत्यु झाला तर अन्य दोघांची प्रकृती गंभिर आहे. जितेंद्र आडे 40 राहणार वाळण बौद्धवाडी असे मृत कामगारचे नाव आहे. प्रशांत किंकले आणि मिलिंद मोरे हे गंभिर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुर्घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर तोडफोड केली. कंपनी व्यवस्थापक संदेश महागावकर यांना विचारले असता कोणत्या वायुची गळती झाली याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST