Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा पुस्तकाच्या रूपात, नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम - An Initiative of Nashik Public Library
🎬 Watch Now: Feature Video
पुणे नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय Ganeshotsav of Public Library Board of Nashik मंडळाने 250 पुस्तकांची भव्य बाप्पाची मूर्ती Ceated a Gand Bappa Idol of 250 Books साकारली आहे. यामध्ये अध्यात्मिक, पौराणिक, सांस्कृतिक, आरोग्य, गोष्टी, आयुर्वेद या पुस्तकांचा संचय आहे. संकल्प गणेशाला, संकल्प सार्वजनिक वाचनालयाचा To Sankalp Ganesha of Sankalp Public Library या अंतर्गत ही पुस्तकमूर्ती साकारण्यात आली आहे. रोज प्रमुख अतिथींसोबत वाचक आणि बाल वाचकांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. श्रीगणेशाला विद्येची देवता म्हटले जाते, त्यामुळे वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने या स्वरूपाची गणेश मूर्ती साकारली आहे, असे आयोजकांनी सांगितले. तसेच, या ठिकाणी एक पेटी ठेवण्यात आली आहे. त्यात आपले आवडते पुस्तक व नावाची चिठी टाकायची आहे. जमा झालेली ही पुस्तके वाचनालयात वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, चिठ्ठीतून लकी ड्रॉ च्या माध्यमातून काही पुस्तक वाचकांना भेट म्हणून दिले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेने Public Library Nashik Ganeshotsav 2022 दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST
TAGGED:
सार्वजनिक वाचनालय नाशिक