Raigad Crime : रायगडच्या महिलेवर साताऱ्यात सामूहिक अत्याचार, माजी आमदार विवेक पंडित यांनी घेतली दखल - Former MLA Vivek Pandit took notice
रायगड : साताऱ्यात फलटण येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड येथे राहणाऱ्या कातकरी कुटुंबातील एका महिलेवर, सातारा फलटण येथील बारा नराधमांनी तिच्या मुलांना कोंडून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या आरोपानंतर संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या सहाय्यतेसाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यानी तिला सातारा येथे घेऊन गेले. तसेच पुढील कारवाई सुरू आहे. याप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी, माजी आमदार विवेक पंडित यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. तर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात ही पीडित महिला आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.