महाराष्ट्र

maharashtra

गणपती बाप्पा

ETV Bharat / videos

Ganeshotsav On Border: 'किंग ऑफ एलओसी’ मुंबईतून जम्मू काश्मीरकडे रवाना, सीमेवर सैनिक करणार थाटात गणेशोत्सव

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 5:29 PM IST

मुंबईGaneshotsav On Border : मुंबईत गणेशोत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू झालीय. अशातच मुंबईतून भारत-पाकिस्तान सीमेवर स्थापन होणार्‍या 'सीमेच्या राजा'ची स्वारी जम्मू काश्मीरच्या दिशेनं रवाना झालीय. बाप्पाची ही स्वारी लवकरच सीमेवरील सैन्यदलाच्या छावणीपर्यंत पोहोचणार आहे. जम्मू काश्मीर येथील पुंछ येथील जवान गणरायाची पूजा करून उत्सव साजरा करणार आहेत. बाप्पाची मूर्ती दरवर्षी मुंबईतून जम्मू काश्मीर येथे पाठवली जाते. दरवर्षी मुंबईहून जम्मू-काश्मीरमध्ये गणपतीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इशर दीदी सांगतात की, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांसाठी आपण हा सण नक्कीच साजरा करू शकतो. यंदा या परंपरेला 14 वर्षे होत आहेत. या गणपतीच्या मूर्तीला भारत-पाकिस्तान सीमेचा राजा म्हटलं जातं. एलओसीवर 11 दिवस सैन्यदलाचे जवान गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मुंबईतील वांद्रे स्थानकात गणपती बाप्पाची मूर्ती सैनिकांसह जम्मूला स्वराज एक्स्प्रेसने रवाना केली जाते. 

ABOUT THE AUTHOR

...view details