Ganeshotsav २०२३ : गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात; 'इको फ्रेंडली' मखरांकडं ग्राहकांचा कल - Ganpati Makhar in Mumbai Market
Published : Sep 16, 2023, 9:12 AM IST
मुंबई : Ganeshotsav २०२३ : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची (Ganpati Festival 2023) सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध (Ganpati Makhar in Mumbai Market) प्रकारच्या साहित्यांनी बाजारपेठ सज्ज झाली आहे. गौरी-गणपतीच्या निमित्तानं मुंबईतल्या दादर मार्केट तसेच लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, मालाड मार्केट येथे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
इको फ्रेंडली मखरांची मागणी वाढली :आपल्या गणरायाला कोणत्या मखरात बसवायचं असा अनेक भाविकांना प्रश्न पडतो. मात्र, आता बाजारात इको फ्रेंडली मखर आले आहेत. या मखरांना ग्राहकांनी पसंती दाखवली आहे. लालबाग बाजारात कृत्रिम पानांसह स्पंजपासून मुठ्ठ्यांच्या मखरांची विशेष (Eco Friendly Makhar) क्रेझ दिसून येते. चिवडा गल्लीतील हनुमान थिएटरमध्ये भरलेल्या या मखरांच्या प्रदर्शनात चक्क तीन हजारांपासून ते 25 -35 हजार किंमतीपर्यंत मखर उपलब्ध आहेत. या मखरांमध्ये खास वैशिष्ट्यपूर्ण असलेले मखर म्हणजे पाण्याचा धबधबा असलेला (waterfall Makhar) मखर. त्याचप्रमाणे कोल्हापूरची अंबाबाई (Kolhapurchi Ambabai Makhar) आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे सेट (Pandharpur Vitthal Makhar) असलेले मखर देखील येथे उपलब्ध आहेत.