महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganesh Visarjan 2022 मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला दादर गणपती विसर्जन परिसराचा आढावा - दादर गणपती विसर्जन परिसराचा आढावा

By

Published : Sep 9, 2022, 3:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दादर चौपाटी परिसरात मुंबई पोलिसांची Mumbai Police तगडी सुरक्षा तैनात आहे. Ganesh Visarjan 2022 कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून दक्ष आहेत. अशात इथल्या एकूण परिस्थितीचा आढावा, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar यांनी घेतला व काही सूचना देखील दिले आहेत. Ganesh Visarjan 2022 मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह काही औरच आहे. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्त्याच्या आहेत, त्या गिरगाव चौपाटी इथे विसर्जित केल्या जातात. मात्र दुपारनंतर मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या मुर्त्या विसर्जित करण्यात येतात. सकाळपासूनच घरगुती आणि छोट्या मंडळाच्या गणेश मुर्त्या विसर्जनासाठी यायला सुरुवात झालेली आहे. Police Commissioner reviewed Dadar area त्याची लगबग आपल्या गिरगाव चौपाटी येथे अनुभवायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये विसर्जनाचा उत्साह सर्वीकडे पाहिला मिळतोय विसर्जन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून सर्व तयारी करण्यात आल्या आहेत. Anant Chaturdashi 2022 मुंबईतील मुख्य विसर्जन स्थळ असलेले गिरगाव येथे देखील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. मात्र यासोबतच बाप्पाच्या मुर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी खास बोटीचे देखील नियोजन करण्यात आले आहे. प्लास्टिकच्या कॅन पासून तयार करण्यात आलेल्या बोटीला मोटर बोटचे इंजिन लावण्यात आल असून, या बोटीच्या माध्यमातून खोल समुद्रात नेऊन घरगुती आणि छोट्या मंडळांच्या बापाच्या मूर्तीत विसर्जन केलं जाते जेणेकरून पाण्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांना आणि महानगरपालिकेकडून घेण्यात आलेली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details