महाराष्ट्र

maharashtra

चिमुकल्या जिजाऊनं वेधलं भाविकांचं लक्ष

ETV Bharat / videos

Ganesh Visarjan 2023 : 'मुंबईच्या राजा'ला निरोप देताना चिमुकल्या जिजाऊनं वेधलं भाविकांचं लक्ष... - immersion procession in mumbai

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 11:51 AM IST

मुंबई :Ganesh Visarjan 2023 आज गणेशमूर्तींचं विसर्जन होत असून, दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता होत आहे. आज गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ 'गणेश गल्ली'च्या 'मुंबईच्या राजा'ची शाही विसर्जन मिरवणूक ( Immersion procession ) 'गणेश गल्ली'तून निघाली आहे. लाखो भाविकांच्या गर्दीतून वाट काढत काढत 'मुंबईचा राजा' (mumbai ganesh immersion procession ) गिरगाव चौपाटीच्या दिशेनं दिमाखात रवाना झाला आहे. छत्रपती शिवरायांच्या रूपातल्या या 22 फुटी मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी चिमुकली ऋत्वी राकेश सावंत ही राजमाता जिजाऊचा पेहराव करून विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील झाली आहे. तिनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राजमाता जिजाऊच्या पेहरावात आलेल्या या चिमुकल्या ऋत्वीबरोबर ईटीव्ही भारतनं साधलेला संवाद...

ABOUT THE AUTHOR

...view details