महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Visarjan 2023

ETV Bharat / videos

Ganesh Visarjan 2023 : उपराजधानीत गणपती विसर्जन मिरवणुकीत सोन्याच्या आभूषणांनी अलंकृत मूर्तीनं वेधलं लक्ष; पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 7:19 PM IST

नागपूर Ganesh Visarjan 2023 : दहा दिवस लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर आज गणेशाला उत्स्फूर्तपूर्ण वातावरणात निरोप दिला जातोय. उपराजधानी नागपूरात नागपूरचा राजा गणपती नागपूरातील मानाचा गणपती आहे. नागपूरचा राजाची विसर्जन मिरवणूक राजेशाही थाटात काढण्यात आली. या गणपतीची सोन्याच्या आभूषणांनी अलंकृत बाप्पांची मूर्ती भविकांचं लक्ष वेधून घेत होती. नागपूर शहर पोलीसांनी घालून दिलेल्या नियमांनुसार गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. 

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : यंदा नागपूर शहरात एकूण १ हजार २१२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाची स्थापना केली होती. त्यापैकी ४५७ सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचे आज विसर्जन होत आहे. उर्वरित मंडळाचे गणपतीचे विसर्जन उद्या आणि परवा होणार आहे. यापैकी चार फुटापेक्षा जास्त मोठ्या मूर्तीचे विसर्जन कोराडी तलाव याठिकाणी करता येईल. तसंच कोलार आणि कन्हान नदीमध्येही ४ फुटापेक्षा जास्त मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. तर त्यापेक्षा छोट्या मूर्तींचे विसर्जन शहरात निर्माण केलेल्या तीनशे पेक्षा जास्त कृत्रिम तलावात करता येईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय. गणपती विसर्जन आणि ईदच्या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी जवळपास पाच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन काळात शहरातील काही रस्त्यावरची वाहतूक ठराविक कालावधीसाठी पर्यायी रस्त्यानं वळवण्यात आलीय. याशिवाय १२०० होमगार्ड व एसआरपीएफच्या दोन तुकड्या ही तैनात करण्यात आल्यात. 

ABOUT THE AUTHOR

...view details