Ganesh Visarjan २०२३ Pune : ढोल, ताशांचा गजर अन् जल्लोष; पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू - Shri Kasba Ganpati
Published : Sep 28, 2023, 1:36 PM IST
पुणे : Ganesh Visarjan 2023 :दहा दिवस भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केली आहे. आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली असून, पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली आहे. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती (Shri Kasba Ganpati) मंडळाची आरती करुन विसर्जन मिरवणुकीला (Shri Kasba Ganpati Visarjan Mirvnuk) सुरुवात झाली आहे. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मानाचा पहिला कसबा गणपती आता विसर्जनासाठी रवाना झाला आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषाने परिसर दणदणला आहे.