Ganesh Visarjan 2023: मानाच्या पाचव्या श्री केसरी वाडा गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक, पहा व्हिडिओ - Ganesh Festival 2023
Published : Sep 28, 2023, 3:43 PM IST
|Updated : Sep 28, 2023, 4:32 PM IST
पुणेGanesh Visarjan 2023: आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात नागरिकांनी लाडक्या बाप्पाची सेवा केली (Shree Kesari Wada Ganapati) आणि आता गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील मानाच्या तसेच विविध गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आज अनंत चतुर्दशीला सकाळी साडे (Ganesha Immersion in Pune) दहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक (Anant Chaturdashi 2023) यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे. 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात पुण्याचा मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. (Ganesh Immersion Procession Pune )
टिळक पंचांगानुसार १७ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठापना झालेल्या मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सव गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होत आहे. तब्बल 40 दिवसांनी केसरीवाडा गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत श्रीगणेश मूर्ती विराजमान आहे. मिरवणुकीत बिडवे बंधूंच्या नगारा वादनाच्या गाड्यासह मिरवणुकीत शिवमुद्रा, श्रीराम आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथकांचे वादन होत आहे. यासह इतिहास प्रेमी मंडळाकडून ‘चाफेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक’ हा देखावाही आकर्षणाचे केंद्र आहे.