Ganesh Visarjan 2023 : जीव धोक्यात घालून गणरायाला निरोप; पहा व्हिडिओ - Farewell to Ganaraya risking life
Published : Sep 28, 2023, 8:16 PM IST
|Updated : Sep 28, 2023, 10:24 PM IST
ठाणे Ganesh Visarjan 2023 : गणेश चतुर्थीपासून बाप्पाची मनोभावे पूजा करून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी कल्याणमधील कचोरे कोळीवाडा येथे खाडीकिनारी असलेल्या विसर्जन स्थळाकडं जाण्यासाठी गणेश भक्त जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून खाडीत गणरायाला निरोप देत असल्याचं चित्र दिसून आलं. परतीचा प्रवास करताना बाप्पांनाही रेल्वे रूळ ओलांडून आपलं स्थान गाठावं लागलं असलं तरी, या भागात महापालिकेच्या वतीने ३ कृत्रिम तलाव पालिका प्रशाशनाकडून उभारण्यात आले आहेत. मात्र, भाविक या तलावात बाप्पाचं विसर्जन न करता स्वतःसह कुटूंबाचा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून खाडीत गणरायाला निरोप देत आहेत. कल्याण पूर्वेतील पत्रीपूल - कचोरे परिसरात दरवर्षी ४ ते ५ हजार गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. मात्र, याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जावं लागतं.