महाराष्ट्र

maharashtra

भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप

ETV Bharat / videos

Ganesh Visarjan 2023: गिरगाव चौपाटीवर मानाच्या गणपतीला निरोप देताना गणेशभक्त झाले भावूक - Ganesh Visarjan 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 8:30 PM IST

मुंबईGanesh Visarjan 2023: आज (गुरुवार) सकाळी 10 वाजता आरती करून मानाचे गणपती मंडपातून बाहेर पडले. आता हे गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. (Girgaon Chowpatty Ganesha Immersion) दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबईच्या आणि (Ganesh Immersion) उपनगरातील कानाकोपऱ्यातून गणेश भक्त मुंबईच्या चौपाट्यांवर दाखल झाले आहेत. यावेळी मानाच्या गणपतीला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाल्याचे जाणवले. 
या आनंदाच्या आणि (BMC) भक्तिमय वातावरणाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी गृह विभागाने तब्बल 19 हजार पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. सोबतच कोणतीही गैरसोय होऊ नये (Mumbai Police Administration) व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका देखील रस्त्यावर (Ganesh Festival 2023) उतरून काम करत आहे. यावर्षी पालिकेचे 10 हजार कर्मचारी, जीवरक्षक, 71 नियंत्रण कक्ष तसेच प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, प्रसाधन केंद्र आणि विविध सुविधांची व्यवस्था केली आहे. तर, या विसर्जनासाठी 69 नैसर्गिक जलाशयांची निवड केली असून 191 कृत्रिम तलाव तयार केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details