महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ganesh procession during Azan नाशकात विसर्जन मिरवणुकीदरम्यान अजान सुरू होताच काय झालं? पाहा हा व्हिडीओ - गणेश विसर्जन 2022

By

Published : Sep 9, 2022, 7:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

नाशिक - अनंत चतुर्दशीला गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसत आहेत. त्याचबरोबर ते संवदेनशील असल्याचे दिसून येणारा व्हिडिओ समोर आला आहे. नाशिक शहरात विसर्जन मिरवणूक निघाली ( Ganesh procession in Nashik today ) होती. वाकडी बारव येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांचाच उत्साह दांडगा होता. गणपती बाप्पा मोरया, या जयघोषात निघालेली ही ( Ganesh procession in Wakadi Barav ) मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती. याच दरम्यान दूध बाजारात मिरवणूक मार्गावर जवळच असलेल्या मशीदमधून अजाण सुरू झाली. यावेळी शिवसेवा युवक मित्र मंडळाचा ( Nashik Shivseva Yuvak Mitra Mandal ) चित्ररथ तिथे होता. अजाण सुरू होताच मंडळाने वादन थांबवून ( Ganesh visarjan 2022 ) काही वेळ शांतता बाळगली. अजाण पूर्ण होताच रथ पुढे मार्गस्थ झाला. मात्र या कृतीतून सद्भावना, आणि एकमेकांच्या धर्माप्रती आदर स्पष्ट होऊन गेला. त्याचप्रमाणे सामाजिक ऐक्याचा संदेश या घटनेने दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details