Ganesh Festival Celebration of Celebrities: पाहा 'या' सेलिब्रेटींच्या घरी झालंय गणपती बाप्पाचं आगमन - सोनू सूद
Published : Sep 19, 2023, 5:37 PM IST
मुंबईGanesh Festival Celebration of Celebrities : मुंबईसह आज संपूर्ण देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सर्व भक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सोनू सूद यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणं यंदाही चित्रपट अभिनेते जितेंद्र, तुषार कपूर आणि एकता कपूर यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. तुषार कपूरनं गणपती बाप्पाची पूजा केलीय. माध्यमांशी बोलताना तुषार कपूरने प्रतिक्रिया दिलीय की, गेल्या अनेक वर्षांपासून बाप्पा आमच्या घरी येत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मी स्वतः बाप्पाची पूजा करत आहे. गणेशोत्सवाच्या काळात सर्व नातेवाईक घरी येतात, सर्वांना भेटतात. बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. (Ganesh Festival 2023)