महाराष्ट्र

maharashtra

'जत्रा गावाकडची'

ETV Bharat / videos

Ganesh Festival 2023: 'जत्रा गावाकडची' या संकल्पनेवर आधारित बाप्पाचा देखावा नक्कीच बघा - गणेश फेस्टिवल

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 10:46 PM IST

नाशिक Ganesh Festival 2023 :  दरवर्षी प्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात आकर्षक असे घरगुती देखावे साकारण्यात आले आहेत. नाशिकमधील अशोकनगर सातपूर परिसरात राहणाऱ्या वैभव आणि विशाल फड (Village Fair) या गणरायाच्या भाविकांनी आकर्षक असा 'जत्रा गावाकडची' देखावा साकारलाय. आजही अनेक खेडेगावांमध्ये सण (Ganeshotsav Scene) उत्सवाच्या निमित्ताने (Satpur Nashik) पारंपरिकरित्या गाव पातळीवर जत्रा भरवली जाते. या निमित्ताने संपूर्ण गावातील नागरिक एकत्र येतात. त्यात असणारे कुस्ती, तमाशा, सोंग अशा कलांचा आनंद घेतला जातो. याच संकल्पनेवर फड कुटुंबाने यंदाच्या वर्षी जत्रेच्या स्वरूपाचा देखावा साकारला आहे. या प्रतिकृतीत जत्रेत ज्या पद्धतीने कुस्तीचे फड, छोटी छोटी हलवाईची दुकाने, बांगड्यांची दुकानं, भांडी दुकान, फुगे फोडण्याचे खेळ, मोठा पाळणा, खाद्यपदार्थ दुकाने, भांड्यांची  दुकाने, सोंग आणि या ठिकाणी असणारा पोलीस बंदोबस्त असे विविध गोष्टींची हुबेहूब देखावे साकारण्यात आले आहेत. हा देखावा बघताना हुबेहूब गावच्या जत्रेची आठवण मनात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details