महाराष्ट्र

maharashtra

गणपतीला आकर्षक पैठणीचा साज

ETV Bharat / videos

Ganesh Festival 2023: अभिनेत्री सायली संजीवच्या घरी गणपतीला आकर्षक पैठणीचा साज; अभिनेत्री सुखदा खांडकेकर कडेही गणरायांचे आगमन - Ganesh Festival 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 8:11 PM IST

नाशिक Ganesh Festival 2023: राज्यभरात घरोघरी गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. गणेश मंडळाबरोबरच घरोघरी भाविकांनी लाडक्या बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात आणि वाजत स्वागत करत प्रतिष्ठापना केली. त्याचप्रमाणे सेलिब्रिटीच्या घरी देखील (Marathi actress Saili Sanjeev) गणपती बाप्पाचं आगमन झालं. 'काहे दिया परदेस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात प्रसिद्ध झालेली नाशिकची अभिनेत्री सायली संजीवच्या घरी दरवर्षी प्रमाणे शाडू मातीच्या सुबक आणि आकर्षक (Ganapati at Saili Sanjeev house) अशा पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी बाप्पाच्या मूर्तीच्या मागे पैठणीचा आकर्षक असा साज देखील करण्यात आला. (Nashik Ganesh Festival) तसंच गेल्या वर्षी 'गोष्ट एका पैठणी'ची या सायलीच्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. या माध्यमातून गणरायाची कृपा दृष्टी असल्याची भावना सायलीने व्यक्त केली.

एकरवी मुंबईत राहणारे मराठी मालिकेतील कलाकार अभिजीत आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे नाशिकला येत असतात. यंदा अभिजित आणि सुखदाने मिळून बाप्पासाठी आकर्षक पर्यवरण पूरक मोरची थीम घेऊन आरास तयार केली आहे. ज्या पद्धतीने बाप्पाचं जितक्या जल्लोषात आगमन होतं तितक्याच जल्लोषात बापांना निरोप द्यायला हवा, प्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती दान करा, निर्माल्य इकडे तिकडे फेकू नका, मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी प्रत्येक भाविकांनी घ्यावी असं आवाहन अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी केलं. तसंच या दहा दिवसांच्या काळात ध्वनी प्रदूषण होऊन इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ असं अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details