Ganesh Festival 2023: लालबागच्या राजासमोर कोळी महिलांनी केलं नृत्य सादर, पहा व्हिडिओ - कोळी महिलांनी केलं नृत्य सादर
Published : Sep 24, 2023, 3:35 PM IST
मुंबईGanesh Festival 2023: लालबाग मार्केट मधील कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची 1934 मध्ये स्थापना केली होती. कोळी बांधवांच्या जागेचा प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी नवस केला होता, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कोळी बांधवांचा लालबागचा राजा असल्याचं ओळखलं जातं. आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सत्यनारायण पूजा आणि पान सुपारीचा कार्यक्रमदेखील रात्री आयोजित करण्यात आला. सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने स्थानिक कोळी महिला लालबागचा राजा समोर असलेल्या मच्छी बाजारात कोळी नृत्य सादर करून लालबागच्या राजासमोर गणेशोत्सवातला आनंद साजरा करतात.
1934 मध्ये स्थापन झालेला लालबागचा राजा मंडळाचे यंदा 90 वें वर्ष आहे. लालबाग मार्केट मधील वसलेल्या मच्छी मार्केट मधील कोळी बांधवांचा गणपती म्हणून लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी दर्यासारंगाच्या रूपात होडीत बसलेला लालबागचा राजा बनवण्यात आला होता. विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशीदेखील लालबागचा राजा निघताना ढोल ताशांच्या गजरात आणि कोळी संगीतात कोळी महिला लालबाग मार्केट मधील चिंचोळ्या गल्लीत आपला नृत्य सादर करून गुलालाची उधळण करत गणरायांना निरोप देतात. आज देखील सत्यनारायण पूजेच्या औचित्तानं कोळी महिलांनी नटून-थटून लालबागच्या राजासमोर कोळी नृत्य सादर केलं.