महाराष्ट्र

maharashtra

विनायक भक्तीची अशीही लळा

ETV Bharat / videos

Ganesh Festival 2023 : गणेशभक्त कृष्णाने मागील 14 वर्षांपासून जपून ठेवल्या बाप्पाच्या मूर्ती; विनायक भक्तीचा असाही लळा - विनायक भक्तीची अशीही लळा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 6:59 PM IST

मुंबई Ganesh Festival 2023 :यश रामकिशोर राजगढिया (कृष्णा) हे भगवान गणेशाचे परम भक्त असून गेल्या 14 वर्षांपासून ते आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करत आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी मागील 14 वर्षांपासून गणेशाच्या मूर्तींचं विसर्जन न करता त्या सगळ्या मूर्ती आपल्या घरात जपून ठेवल्या आहेत. त्यामागे (Preservation of Ganesh Idols) त्यांची गणेशजींबद्दलची  नितांत भक्ती आहे. (Installation of Ganesha Idols) एकदा बाप्पा घरी आले की, त्यांना निरोप द्यावासा वाटत नाही, असं ते सांगतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गंगाजलमिश्रित पाण्यात डुबकी मारून मूर्ती झाकली जाते आणि दिवाळीनंतर ती मूर्ती डब्यात ठेवली जाते. (Ganesha Bhakta Krishna ) मुंबई महासम्राटतर्फे यंदा 14 व्या वर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि कृष्णाने यंदा अनोखी थीम घेऊन मूर्तीची स्थापना केली आहे. यामध्ये त्यांचे वडील राम किशोर आणि आई अनिता राजगढिया यांचाही पूर्ण पाठिंबा होता. यश रामकिशोर राजगढिया (कृष्णा) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, संपूर्ण महाराष्ट्रातील 8 फूट उंचीची गणेशाची मूर्ती त्यांच्याकडे आहे. ट्रॉलीवर गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध शिल्पकार कुणाल पाटील यांनी ही मूर्ती बनविली आहे.
यंदाची मूर्ती अर्ध नारीश्‍वराच्या रूपात असून, ही एक अनोखी संकल्पना आहे. कृष्णाने ही मूर्ती नायगाव वसई येथून आणली आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र लखलखाट झाल्याचे कृष्णाने सांगितले. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेकजण त्यांच्याकडे दर्शनाला येतात. मला स्वत: मुंबईभर बाप्पाच्या दर्शनाचा प्रचंड उत्साह आहे. मी अनेक ठिकाणी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतो. बाप्पा मला, माझ्या कुटुंबाला, मुंबई आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा, असे कृष्णा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details