Ganesh Festival 2023: महाराष्ट्र सदनात गणरायाची आरती; 'बाप्पा महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव'- भगतसिंह कोश्यारी
Published : Sep 20, 2023, 9:04 AM IST
|Updated : Sep 20, 2023, 10:56 AM IST
नवी दिल्ली: Ganesh Festival 2023: चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता असलेल्या लाडक्या बाप्पाचं म्हणजे विघ्नहर्त्या गणरायाचं जल्लोषात आगमन होऊन घरोघरी बाप्पा विराजमान (Satara Ganeshotsav)झाले आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) देखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली. महाराष्ट्रातील जनतेला सुख, समृद्धी लाभू दे, अशी खासदार पाटील आणि भगतसिंह कोश्यारींनी प्रार्थना केली. तसेच राज्यात सर्वच आजी-माजी मंत्री आणि नेते यांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचं मोठ्या उत्साहात, जल्लोषापूर्ण व भक्तिमय वातावरणात बुधवारी आगमन झाले आहे.