महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Festival 2023

ETV Bharat / videos

Ganesh Festival 2023 : मुख्यमंत्र्यांच्या घरच्या दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन, पत्नीने वाजवला ढोल; पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 11:34 AM IST

ठाणे Ganesh Festival 2023 : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लईचवाडी येथील घरी दीड दिवसाच्या श्री गणेशाचं रात्री विसर्जन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने ढोल वाजवत गणेश मूर्तीचं विसर्जन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नातू रुद्राक्षसह सर्व पूजाविधी यथासांग केले. मुख्यमंत्र्यांनी ढोल ताशाच्या गजरात आपल्या बाप्पांचं मासूंदा तलावात विसर्जन केलं. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री काही वेळ आपला नातू व परिवारासह आनंद घेताना दिसले. राज्यात सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरु असला तरी कोकणात मात्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला सुरुवात झाली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या कुटुंब परंपरेनुसार त्यांच्या ठाण्यातील घरच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलंय.  

ABOUT THE AUTHOR

...view details