महाराष्ट्र

maharashtra

बैलाचा केला आगळावेगळा अंत्यविधी

ETV Bharat / videos

Lakshya Bul Funeral Procession: बैलावर होते जिवापाड प्रेम; लक्ष्या बैलाचा केला आगळावेगळा अंत्यविधी - नारायण मुक्ताजी आरोटे

By

Published : Jul 26, 2023, 7:53 PM IST

अहमदनगर  : बळीराजा आपल्या पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करतो. याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, शेवटपर्यंत सांभाळून त्यांचा अंत्यविधी करण्याच्या घटना दुर्मीळ घडतात. अशीच एक घटना अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडली आहे. येथील शेतकर्‍याने लाडक्या 'लक्ष्या' बैलाला सनई ताशाच्या गजरात भावपूर्ण निरोप देऊन अंत्यविधी केला. ब्राह्मणवाडा येथील शेतकरी नारायण मुक्ताजी आरोटे यांनी सुमारे 21 वर्षांपूर्वी, एक वर्ष वय असलेला लक्ष्या बैल घेतला होता. त्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी त्याचे लाड पुरवत सांभाळ केला. त्यानेही आपल्या मालकाला काहीही कमी पडू दिले नाही. राजबिंडा, चकाकी आणि चपळाई असलेला लक्ष्या क्षणार्धात कोणाचेही लक्ष वेधून घ्यायचा. त्याने पहिल्याच वर्षी खंडोबारायाच्या यात्रेतील शर्यत जिंकून दाखवली होती. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात लक्ष्याने शर्यतींमध्ये नाव कमावले. 
मात्र, वय झाल्याने लक्ष्या थकला आणि त्याने मालकाची कायमचीच साथ सोडली. मालकानेही त्याच्यावरील प्रेमापोटी सनई ताशाच्या गजरात अंत्यविधी केला. यावेळी आरोटे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. तर गाडाशौकिन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details