Video : पुण्यात प्रेयसीसाठी केली मित्राची हत्या, पाहा नेमकं काय घडलं... - प्रेयसीसाठी केली मित्राची हत्या पुणे
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका 58 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. यासाठी मित्राच डोक धडापासून वेगळ करत त्याची हत्या Friend Killed for girlfriend केली आहे. तसेच स्वतःचे कपडे मित्राच्या मृतदेहाला घातले. हा मृतदेह त्यांचाच असे भासावे म्हणून या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आलेले आहे. गावापासून लांब जाऊन प्रेयसी सोबत राहण्यासाठी हा पराक्रम आरोपी केल्याचे दहा दिवसांनी समोर आले आहे. सुभाष थोरवे असे 58 वर्षीय आरोपीचे नाव आहे. रवींद्र घेनंद या 48 वर्षीय मित्राची त्यांने निर्घृण हत्या केली आहे. हा सर्व प्रकार त्याने 45 वर्षीय प्रेयसीसोबत राहण्यासाठी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Pune Crime
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST