Video:अज्ञातांनी चारचाकी वाहने फोडली; दारूच्या नशेत कृत्य केल्याची शक्यता - कोल्हापूरात अज्ञातांनी चारचाकी वाहने फोडली
कोल्हापूर : कोल्हापूरातल्या मंगळवार पेठ परिसरातील पद्मावती मंदिरच्या ( Padmavati Temple Kolhapur ) पाठीमागील बाजूला पार्क केलेल्या 10 ते 15 चारचाकी वाहने काही अज्ञातांनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. आज सकाळी अनेकजण मॉर्निंग वॉकसाठी गेले असता सर्वांना चारचाकी गाड्यांच्या सर्व काचा फोडल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस ( Kolhapur Police ) घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST