ऊस तोडणी चालू असताना शेतात आढळले बिबट्याचे चार बछडे; परिसरात भीतीचं वातावरण - ऊस तोडणी
Published : Dec 13, 2023, 5:21 PM IST
राहुरी (अहमदनगर)leopard Cubs In Farm :गेल्या काही दिवसांपासून शहरात बिबट्याचा वावर वाढला ( The leopards range increased ) आहे. राहुरी तालुक्यातील विठ्ठल भाऊराव शेटे यांच्या उसाच्या शेतात (Sugarcane Farm) चार नवजात बिबट्याचे बछडे (Four leopards Cubs) आढळून आल्यानं, परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राहुरी तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील विठ्ठल शेटे यांच्या शेतात ऊस तोडणी करताना कामगारांना बिबट्याचे चार बछडे आढळून आले. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल होऊन बछड्यांना ताब्यात घेतलं. हे बिबट्याचे बछडे साधरणातः दोन महिन्यांचे आहेत. तर वन विभागाच्या वतीनं ठीक ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. दुसरीकडे मजुरांनी ऊस तोडणी करताना काळजी घ्यावी असं आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलंय.