Cylinder Explosion at Buland City : बुलंदशहरातील एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट; चौघांचा जागीच मृत्यू - बुलंदशहर स्फोट बातमी
बुलंदशहर : कोतवालीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी १२ वाजता एका घरात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, दोन किलोमीटर दूरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. या स्फोटामुळे घराच्या खिडक्या आणि दरवाजेही तुटले. आतापर्यंत अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्लोक कुमार सिंह यांनी सांगितले की, घरात रसायन बनवले जात होते. शेताच्या मधोमध हे घर बांधले आहे. हे घर लोकवस्तीपासून दूर होते. त्यांनी सांगितले की, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात फक्त धुराचे लोट दिसत होते. स्फोटाचा मोठा आवाज दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना कोणाचाही मृतदेह योग्य अवस्थेत आढळून आला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार मृतदेह सापडले आहेत.