MP Shewale: खासदार शेवाळे विचित्र आहेत, त्यांना आम्ही सरळ करू; चंद्रकांत खैरे संतापले - Former MP Chandrakant Khair
औरंगाबाद - राहुल शेवाळे यांची तर अनेक लफडी आहेत. ते एका महिलेला घेऊन परदेशात जात होते. त्यावेळी त्यांची बायको उद्धव ठाकरे साहेबांकडे रडत आली होती. (Former MP Chandrakant Khair) मग ती भानगड मिटवत त्यांचा संसार उद्धव साहेबांनी सुरळीत केला होता, आज ज्या ताटात खाल्ल त्यांच्यावर उलटले आहेत. ते आता मुंबईतून निवडून येणार नाहीत असे म्हणत आम्ही मराठवाड्यातील शिवसैनिक आहोत, या शेवाळेला सरळ करू असा दम औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शेवाळे यांना भरला आहे. (MP Rahul Shewale) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर खैरे पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST