महाराष्ट्र

maharashtra

भाऊसाहेब चिकटगावकर

ETV Bharat / videos

Aurangabad News : रस्त्याच्या भूमिपूजनावरून आजी-माजी आमदारांत जुंपली - आमदार रमेश बोरणारे

By

Published : Aug 20, 2023, 9:56 PM IST

Updated : Aug 20, 2023, 10:42 PM IST

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) - जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात रस्त्याच्या भूमिपूजनावरून आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली होती. वैजापूर तालुक्यातील रस्त्याचे भूमीपूजन 17 ऑगस्ट रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावरुन शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश बोरणारे तसेच माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी विकासकामावरुन एकांमेकांवर टीका केली आहे. सत्ता गेल्यानंतर ठाकरे गटाला शहाणपण सुचले अशी टीका आमदार रमेश बोरणारे यांनी केली होती. त्यावर माजी आमदार चिकटगावकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. विकास कामांवर आमदार बोरणारे आयत्या रेघा मारतात. रस्ते आम्ही मंजूर केले. मात्र काही नेते त्याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील जनतेला काम कोणी केले माहिती आहे, अशी टीका चिकटगावकरांनी आमदार बोरणारे यांच्यावर केली आहे.  

Last Updated : Aug 20, 2023, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details