Aslam Sheikh On Baba Dhirendra : माजी मंत्री अस्लम शेख काय म्हणाले बागेश्वर धाम बाबांबद्दल? पाहा व्हिडिओ - Aslam Sheikh reaction Dhirendra Shastri
मुंबई :बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री वादात सापडले आहेत. त्यांच्याबाबत अस्लम शेख यांना प्रश्न विचारला असता, देशात बेरोजगारी, कुपोषण, सीमेवरील समस्या या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालतात आणि स्वत:ला चमत्कारिक म्हणतात असा आरोप धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर होत आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली आहे. आता धीरेंद्र शास्त्री यांचे नातेवाईक लोकेश गर्ग यांना धमक्या आल्या आहेत. लोकेश गर्ग यांनी मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये धमक्या मिळाल्याची तक्रार दाखल केली आहे. लोकेश गर्ग धीरेंद्र शास्त्री यांचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे.
हिंदू संघटनांचा पाठिंबा : मालाड पश्चिम, मुंबई येथे माही बीज महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. मुंबईचे काँग्रेस नेते शिखी विकास मंडळातर्फे मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री अस्लम शेख यांनी तिथे उपस्थिती लावली होती. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपली वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे अनेक नेते आणि हिंदू संघटनांनी शास्त्रींना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमिवर आता इतरही नेते वेळोवेळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यामध्ये पुरोगामी विचारांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्याचवेळी बाबांच्या बाजूने बोलणारे नेतेही दिसून येत आहेत. उत्तर भारतातील हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांनी बाबांना पाठिंबा दिला आहे.
देशात बेरोजगारीच्या समस्या : देशात बेरोजगारीसारख्या अनेक समस्या आहेत. कुपोषणामुळे लोक मरत आहेत. या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही धर्मावर बोलणे गरजेचे नाही. त्याचवेळी धीरेंद्र शास्त्री यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धर्तीवर नवा नारा देत भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची भाषा केली आहे. या प्रकरणी एक दिवसापूर्वी बागेश्वर बाबांचे काका स्वामी प्रसाद गर्ग यांनी दावा केला होता की, काही वर्षांपूर्वी बनारसमधील एका साधूने तुमच्या कुटुंबातील एक मुलगा काही दिवसात देशात आणि जगात चमकेल, असे सांगितले होते. आता मला कळले आहे की, तो मुलगा आमचा धिरेंद्र आहे, असे धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे काका स्वामी प्रसाद गर्ग यांनी सांगितले.