महाराष्ट्र

maharashtra

Satyapal Malik

ETV Bharat / videos

Satyapal Malik: खाप नेत्यांची भेट घेऊन सत्यपाल मलिक पोलीस ठाण्यात गेले, पोलिसांनी दिले हे स्पष्टीकरण

By

Published : Apr 22, 2023, 8:00 PM IST

नवी दिल्ली : माजी गव्हर्नर सत्यपाल मलिक यांना सीबीआयकडून समन्स मिळाल्यानंतर राजकारण तापले आहे. यासाठी खाप नेते दिल्लीतील आरके पुरम येथील डीडीए पार्कमध्ये जमले होते. परंतु, येथील धरणे धरण्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, त्यामुळे तेथे जमलेल्या लोकांना हटवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि यूपीच्या खाप पंचायतींचे काही नेते शनिवारी सकाळी सत्यपाल मलिक यांच्या घरी पोहोचले. याची माहिती मिळताच पोलीसही तेथे पोहोचले. त्यानंत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, लोकांना हटवल्यानंतर मलिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले अशी आफवा पसरली. त्यानंतर चांगलेच वातावरण तापले. त्यावर पोलिसांनी अशी कोणतीही घटना घडली नाही. मलिक पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, त्यांना आम्ही आपण आपल्या घरी जावे असे सांगितले आहे असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details