Anand Mohan Release : नितीशजी हे चुकीचे आहे! आनंद मोहनच्या सुटकेवर जी कृष्णय्या यांच्या मुलीची अन् पत्नीची प्रतिक्रिया - DM G Krishnaiah Murder Case
पाटणा/हैदराबाद: ज्या व्यक्तीमुळे बालपणीच मुलीच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले. ज्या स्त्रीचे कुंकु पुसले गेले त्या महिला आज आपले दु:ख मांडत आहेत. त्या आपली व्यथा मांडण्याचे कारण बिहारमधीलन माजी खासदार आनंद मोहन सिंग यांची जेल मॅन्युअलमध्ये बदल करून गुरुवारी पहाटे 4 वाजता सहरसा तुरुंगातून सुटका करण्यात आली. एका रात्रीत सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांची लगेच सुटका करण्यात आली. जिल्हा दंडाधिकारी जी कृष्णय्या यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तब्बल 16 वर्षांनंतर त्यांची सुटका झाली आहे. दरम्यान, यावर जी कृष्णय्या यांची पत्नी आणि मुलीने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. नितीश कुमार सरकारने तसे केले नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींकडेही आम्ही मागणार आहोत असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.