Prithviraj Chavan माझा मतदार संघ.. माझं राज्य.. असे पंतप्रधान कधीच पहिले नाही.. पृथ्वीराज चव्हाण यांची टीका - Prithviraj Chavan
पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी तसेच विरोधक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला सरकार स्थापन करताना, नंतर 50 खोके आणि आत्ता राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाऊ लागल्याने, विरोधक हे आक्रमक होत सत्ताधारी शिंदे सरकारवर टिका करत आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका Prithviraj Chavan criticized PM Modi केली आहे. राज्यात जे प्रकल्प आज इतर राज्यात over project which has continuously moved खास करून गुजरातमध्ये from Maharashtra state to Gujarat जात आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून; माझा मतदार संघ, माझं राज्य असा विचार करणारे मी माझ्या आयुष्यात पहिलेच पंतप्रधान बघितले आहेत, अशी टीका यावेळी पृथ्वीराज चव्हाण Former CM Prithviraj Chavan यांनी केली. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात येणार आहे. याबाबत नेमके कशा पद्धतीने नियोजन असणार आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST