महाराष्ट्र

maharashtra

किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरण

ETV Bharat / videos

kirit somaiya viral video : राज्यात किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओनंतर संतापाची लाट; पहा व्हिडिओ - ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

By

Published : Jul 18, 2023, 10:35 PM IST

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या नेहमीच विविध आरोप करत विरोधकांना सळे की पळो करतात. मात्र आता विषय उलटला आणि टार्गेट झाले खुद्द किरीट सोमय्याच. सोमवारी रात्री किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. अधिवेशनाचा दुसरा दिवसही सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणानेच गाजवला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी सरकारवर टीकेची सरबत्तीच केली. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तर उपसभापतींकडे चक्क आठ तास असलेला व्हिडिओंचा एक पेऩ् ड्राईव्हच सादर केला आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. अशा व्हिडिओची सत्यता तपासावी व चौकशी करावी अशी विनंती किरीट सोमय्यांनी फडणवीसांकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. पुणे, नाशिक, सोलापूर, बीड अशा विविध जिल्ह्यांमध्ये महिला शिवसैनिकांनी सोमय्यांच्या प्रतिमेला शेण, जोडे, हातोडा मारत निषेध केला जात आहे. तर येत्या काही दिवसात हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details