महाराष्ट्र

maharashtra

विमानतळावर फ्लाईंग अकॅडमी सुरू

ETV Bharat / videos

Flying Academy : कराड विमानतळावर फ्लाईंग अकॅडमी सुरू; अवकाशात वाढली विमानांची घरघर, पाहा व्हिडिओ - वैमानिक प्रशिक्षणाला सुरूवात

By

Published : Aug 3, 2023, 6:54 PM IST

सातारा :मुंबईतील प्रख्यात उद्योजक परवेज दमानिया आणि अश्विन अडसूळ डायरेक्टर असलेल्या, अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबच्यावतीने कराड विमानतळावर बुधवारी वैमानिक प्रशिक्षणाला औपचारिक प्रारंभ झाला. फेब्रुवारी 2019 मध्ये परवेज दमानिया यांनी कराड विमानतळाची पाहणी करून फ्लाईंग अकॅडमीची घोषणा केली होती. त्यानंतर विमानतळावर सुविधा उपलब्ध केल्या. आता प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. २० मुलांची पहिली बॅच प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. प्रशिक्षणासाठीची विमाने सात महिन्यापूर्वी विमानतळावर दाखल झाली होती. दोन विमाने दोन सीटर तर दोन विमाने चार सीटर आहेत. विमानांच्या पार्किंग आणि मेन्टेनन्ससाठी एअरक्राफ्ट हँगरची उभारणी करण्यात आली आहे. फ्लाईंग स्कूल सुरू होणे ही कराडसाठी चांगली बाब आहे. हे स्कूल लोकप्रिय होईल असा विश्वास परवेज दमानिया यांनी व्यक्त केला. दरम्यान, कराड विमानतळाचा वाणिज्यिक वापर व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details