महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नाशिक - पीएफआयच्या पाच जणांना नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी - सुनावली 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

By

Published : Sep 22, 2022, 10:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

नाशिक -देशात झालेल्या अनेक दंगलीच्या मागे पीएफआय संघटनेचे कनेक्शन ( Five PFI members remand in police custody ) असल्याचे समोर आल्यानंतर देशभरात पीएफआय कार्यालयावरती छापे ( NIA raids in Maharashtra ) टाकण्यात आले. शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. अशात महाराष्ट्रातील पॉप्युलर फ्रंट अँड इंडिया या संघटनेशी संबंध असलेल्या मालेगाव, पुणे, कोल्हापूर, बीड येथील पाच जणांना एएनआय आणि एटीएस टीमने अटक केली. यात मालेगाव येथून सैफु रहेमान, पुणे येथून अब्दुल कैय्युम शेख,राझी अहमद खान, कोल्हापूर मधून नसीब मुल्ला, तर बीडवरून वसीम शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आज नाशिकच्या ( Nashik Sessions Court ) जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे ( police custody till October 3 ) आदेश दिले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details