महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video मजुरांनी भरलेली कार पडली खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा मृत्यू ,अन्य पाच जण गंभीर जखमी - लखीमपूर येथे मजुरांनी भरलेली कार पडली खड्ड्यात

By

Published : Nov 22, 2022, 12:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.Five People Died In lakhimpur तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शाहजहांपूर येथून सुमारे 12 प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगी टॅक्सी पालिया पोलिस स्टेशन हद्दीतील अटारियाजवळ खड्ड्यात पलटी झाली. Car accident लखीमपूर येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी अन्य पाच जण जखमी झाले.जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथील रस्ता थोडा अरुंद होता. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असावा. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुखन पुरवा गावातील रहिवासी राजू पाल यांनी सांगितले की, ते शाहजहांपूरहून झायलो कारमध्ये बसले होते. गाडीत 12 जण होते. पालियाजवळील अटारियाजवळ चालक झोपला.यामुळे कार खड्ड्यात पलटी झाली. नाला पाण्याने भरलेला होता. काही लोक कसेबसे बचावले. यादरम्यान अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने वाहन बाहेर काढले आणि बचावकार्य सुरू केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details