New Parliament Building : अशी आहे संसदेची नवी इमारत! पहा Video - NEW PARLIAMENT VIDEO
नवी दिल्ली, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून देशात सध्या मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका शुक्रवारी फेटाळण्यात आली आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात विशेष पूजा आणि हवनाने होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समारोपीय भाषणाने त्याची सांगता होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नवीन संसद भवनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तर पहा कसे आहे हे नवीन संसद भवन.