Lok Kala Sammelan : वाटेगावला रविवारी पहिले शाहीर लोककला संमेलन; भारत पाटणकर यांची माहिती
सातारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेल्या वाटेगाव (ता. वाळवा) येथे रविवारी पहिले शाहिरी लोककला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. लावणी सम्राज्ञी मंगला बनसाडे या संमेलनाच्या उद्घाटक असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे आणि नातू सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती, संमेलनाचे निमंत्रक भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अमर शेख यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी यंदापासून शाहिरी लोककला संमेलन सुरू करण्यात आल्याचे पाटणकर यांनी सांगितले. संयोजन समितीच्यावतीने विद्रोही शाहीर सचिन माळी, विजय मांडके, शाहीर अनिकेत मोहिते, शाहीर कृष्णा कांबळे यांनी मंगला बनसोडे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा व अन्य एका कादंबरीवर वगनाट्य सादर केल्याचे मंगला बनसाडे यांनी संयोजकांना सांगितले.