महाराष्ट्र

maharashtra

Fire Crackers Burst in Theatre

ETV Bharat / videos

Fire Crackers Burst in Theatre : चित्रपटगृहात फटाके फोडत सलमानच्या 'टायगर 3' चं स्वागत; मालेगावातील धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडिओ - टायगर 3 या चित्रपटाचे शो

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 11:46 AM IST

मालेगाव (नाशिक) Fire Crackers Burst in Theatre : मालेगाव शहरातील एका चित्रपटगृहात टवाळखोरांनी हुल्लडबाजी करत फटाक्यांची तुफान अतिशबाजी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. याआधीदेखील अनेकदा असे प्रकार घडले आहेत. यामुळे प्रेक्षकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न काही हुल्लडबाजी तरुणांकडुन करण्यात येतो. मालेगाव शहरात कायम असे प्रकार घडत असतात.  याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशा लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

चित्रपट गृहात वाजवले वेगवेगळे फटाके : रविवारी रात्री या चित्रपटगृहात सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटाचे शो सुरू होता. नेहमीप्रमाणे सलमानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. चित्रपट सुरू झाल्यानंतर काही चाहत्यांनी वेगवेगळे फटाके फोडण्यास सुरुवात केली. याठिकाणी दिवाळीतील रॉकेट्सही सोडले गेले. यामुळं अन्य प्रेक्षकांची धांदल उडाली. जवळपास 10 मिनिटे बॉम्ब, रॉकेट्स, फुलझाड व इतर फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. विशेष म्हणजे बाल्कनीतील प्रेक्षक शिट्या वाजवून नाचत त्याचं समर्थन करीत होते. मात्र फटाके वाजविताना चित्रपटगृहाला आग लागून मोठी दुर्घटना होऊ शकते, याचेदेखील भान हुल्लडबाजी करणाऱ्यांना नसणं ही चिंतेची बाब आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details