Video : नागपुरात इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग, लाखोंचे साहित्य जळून खाक - नागपूर कॉटन मार्केट
नागपूर - नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरातील महत्तम फुले मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील ईक्ट्रॉनिकच्या दुकानाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठं नुकसान झाले. बुधववारी रात्री 9 वाजताच्या सुमारास दुकान बंद करताना अचानक आग लागल्याचे भूषण सेहगल यांच्या लक्षात आले. त्यामुळे लागलीच अग्निशामक दलाल बोलवालत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तू साऊंड सिस्टम आणि बरेच साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी पाण्याचा मारा करून कुलिंग प्रोसेस सुरू आहे, आगीत झालेल्या नुकसानीचा आकडा कळू शकला नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST