Fire During Ram Navmi : राम नवमीला टाकलेल्या मंडपाला फटाक्यांमुळे भीषण आग, संपूर्ण मंडपच जळून खाक - आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा
पश्चिम गोदावरी (आंध्रप्रदेश):पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तनुकू मंडळाच्या दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान गोंधळ उडाला. उत्सवादरम्यान फटाक्यांमुळे मंडपाला अचानक आग लागली. यामुळे संपूर्ण मंडपच जळून खाक झाले. जिल्ह्यातील दुवा गावातील वेणुगोपाल स्वामी मंदिरात रामनवमीचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंपरेनुसार गावात रामनवमीची शोभा यात्रा काढण्याची तयारी सुरू होती. त्यानंतर मिरवणुकीत वापरण्यासाठी आणलेले फटाके मंडपामध्ये ठेवले होते. काही वेळातच सर्व फटाक्यांनी पेट घेतला आणि संपूर्ण मंडपालाच आग लागली. उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची भीतीने पळापळ सुरू झाली. काही स्थानिक लोक आणि भाविकांनी मिळून आग आटोक्यात आणली. या आग लागून झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. या अपघातात दोन लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा: मंदिरात गेलेले २५ भक्त पडले विहिरीत, मोठी दुर्घटना