महाराष्ट्र

maharashtra

जोगेश्वरीमध्ये फर्निचरच्या गोदामाला आग, कोणतीही जीवितहानी झाली नाही

ETV Bharat / videos

Fire Breaks Out in Jogeshwari : जोगेश्वरीमध्ये फर्निचरच्या गोदामाला आग, कोणतीही जीवितहानी नाही - जोगेश्वरीमध्ये फर्निचरच्या गोदामाला आग

By

Published : Mar 13, 2023, 2:11 PM IST

Updated : Mar 13, 2023, 3:20 PM IST

मुंबई - जोगेश्वरी भागातील एका फर्निचरच्या गोदामाला सोमवारी भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील जोगेश्वरी भागातील राम मंदिराजवळ सोमवारी सकाळी 11 वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली, असे अधिकाऱ्याने सांगितले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल घटनास्थळी असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आग पाहायला लोकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे लोक तिथे थांबले आहेत. यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परिसरातील किरकोळ विक्रेते आणि कारखानदारांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा आल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले (सामूहिक नुकसान करोडोंपर्यंत असू शकते). त्यांनी सरकारकडे मदतीचे आवाहन केले. आग आटोक्यात येताच रहिवाशांनी पोलीस, स्थानिक संस्था अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, फर्निचर मार्केटला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आधी धूर आला आणि काही वेळातच भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कोणीतरी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे प्रयत्न पथक करत आहेत. फर्निचर हे ज्वलनशील पदार्थ असल्याने आग पसरली आहे.जोगेश्वरी (पश्चिम) येथील रिलीफ रोडवरील फर्निचरच्या गोदामाला सकाळी ११ वाजता तिसऱ्या स्तरावर आग लागली. आग इतकी भीषण होती की काही किलोमीटरपर्यंत धुराचे लोट पसरले होते.धूर आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६गाड्यांना पाचारण करण्यात आले होते, मात्र परिस्थिती पाहता आणखी ८ गाड्या पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या एकूण १६ अग्निशमन गाड्या कार्यरत आहेत. लोक अडकल्याची कोणतीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.परिसरातील किरकोळ विक्रेते आणि कारखानदारांनी सांगितले की त्यांना लाखोंचे नुकसान होण्याची भीती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा आल्याच्या तक्रारीही व्यापाऱ्यांनी केल्या.१०० हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेत आतापर्यंत कोणीही जखमी झालेले नाही ही दिलासादायक बाब आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग एवढी भीषण आहे की, आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. धुराच्या ढगांनी आकाश वेढले आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक लोकही मदत करत आहेत. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यात गुंतले आहे. या आगीत मार्केटमधील डझनभर दुकाने जळून खाक झाली आहेत. ओशिवरा फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत १००हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत. आगीमागे सिलिंडरचा स्फोट झाल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, याबाबत ठोस माहिती नाही. या परिसरात ६०० हून अधिक दुकाने आहेत. ही आग लेव्हल ३ म्हणून घोषित करण्यात आली असून ही आग खूप गंभीर आहे. पाण्याने आग विझवली जात आहे.

Last Updated : Mar 13, 2023, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details